HW News Marathi
राजकारण

जनतेच्या मनातील आग व्यक्त करण्यासाठी निवडणूक लढवतोय !

मुंबई | “जनतेच्या मनातील आग व्यक्त करण्यासाठी निवडणूक लढवतोय,”असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची भूमिका स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी (११ ऑक्टोबर) भांडूपमध्ये प्रचार सभा घेतली होती.

“नोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो की सरकारच्या ह्या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचे सावट येणार.. आणि तसेच घडले. बीपीसीएल रिलायन्सला द्यायचा घाट सुरु आहे, आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी?”, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

  • नोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो की सरकारच्या ह्या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचे सावट येणार.. आणि तसंच घडलं. बीपीसीएल रिलायन्सला द्यायचा घाट सुरु आहे, आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी?
  • आझाद मैदानावर रझाकारांच्या मोर्च्याच्या वेळेस रझाकारांनी पोलिसांवर हात उचलला, त्यावेळेस बाकीचे पक्ष शेपट्या घालून बसले होते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला होता आणि पोलिसांवरच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता
  • एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केले त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला.पण पुन्हा तो परिसर सरकारी आशीर्वादाने फेरीवाल्यानी भरले.आंदोलने आम्ही करायची, सरकार काहीच करणार नाही तरीही माध्यमे मला विचारणार की तुम्ही आंदोलने अर्धवट सोडता?
  • त्रिभाषासूत्र ठीक आहे पण मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल
  • राज्यात चौथी भाषा आणाल तर याद राखा
  • मनसेमुळे मोबाईलमध्ये मराठी भाषा वापरले
  • मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातील ७८ टोलनाके बंद झाले
  • निवडणुकीच्या वेळी राग व्यक्त करण्याची वेळ आहे
  • महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होते, काय झाले
  • त्या आश्वासनाच? आधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार? कुठे गेले तंत्रज्ञान? खड्डे पडत आहेत, कंत्राटदार कमवतोय, तरीही आपण प्रश्न विचारत नाही
  • भाजपच्या काळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाटले
  • शिवसेना-भाजपच्या ५ वर्षापूर्वीचा जाहीरनाम्याचे राज ठाकरे वाचन करत आहेत
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केले, शेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे असे भाजपने २०१४ च्या जाहीरनाम्यात म्हणले होते.काय वेगळे घडले
  • महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढले आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय, काय बदल झाला?
  • डोंबिवलीत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.
  • बँक बुडाली तरी कोणी जाब विचारायला जात नाही
  • ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रात सभा सुरु असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
  • मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर

  • त्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील ५ वर्ष जातात, निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोके विसरतात, आणि लोके पण प्रश्न विचारत नाहीत आणि माध्यमे देखील सत्ताधाऱ्यांना एकही प्रश्न विचारायला तयार नाहीत की काय केलंत त्या आश्वासनांचे?
  • भांडुप येथील सभास्थानी राजसाहेबांचं आगमन
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तीनपैकी एका आरोपी डॉक्टरला अटक

News Desk

काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला तरीही राहुल गांधींमध्ये सुधारणा झाली नाही !

News Desk

मी बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

News Desk