HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणूक मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे !

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर घोषणा केली आहे. राज ठाकरेंनी ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नाही. ही लोकसभा निवडणूक मोदी – शहा विरुद्ध देश अशी आहे. ही दोन माणसे जेव्हा बाजुला होतील त्यानंतरची लढाई ही खरी पक्षांमधील असेल राज यांनी सांगितले. त्याचबरोबर महाआघाडीत सामील होणाऱ्या चर्चेला देखील पूर्ण विराम दिला आहे. राज यांनी आज (१९ मार्च) त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

भाजपच्या “मै भी चौकीदार” या मोहिमेचा खरपूस समाचार घेतला. ते मी चौकीदार इतका छोटा विचार भाजप करत आहे असे म्हणाले. तसेच ही निवडणूक भारताची आहे की नेपाळची? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.बारामतीचा पोपट अशी टीका करणाऱ्यांचे आम्ही यांचे कपडे काढले असा पलटवार केला. तसेच राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बारामतीतील जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत आता बारामतीची स्क्रिप्ट कोण वाचत होते हे सांगा असे त्यांनी विचारले.

मी येथून पुढे जे मेळावे घेणार ते भाजप विरोधात असल्याचे आज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मोदींचे मै भी चौकीदार ही मोहीम मतदारांसाठी रचलेला सापळा असून या सापळ्यात देशताील जनतेने अडकू नये, असे आवाहन राज यांनी केले आहे. मोदी आणि शहा या दोघांना मतदान न करणे.

त्यामुळे मनसेने भाजपला मतदान करु नये, याने कोणाचाही फायदा झाला तरी चालेल असे वक्तव्य केले. मोदी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना वाईट म्हणतात, स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात पण, प्रधान सेवक हा शब्दच नेहरुंचा आहे. असे म्हणत इतका खोटारडा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही, अशा शब्दात राज यांनी मोदींवर बोचरी टीका केली. राज ठाकरेंनी पुढची सभा गुढी पाडव्याला घेणार आहे, त्यावेळी सगळ्या विषयांवर सविस्तर बोलेन असे सांगितले.

Related posts

खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

News Desk

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

ज्यांचे फोटो छापायचे ते छापा, आपापसात मारामाऱ्या करा…महाजॉब पोर्टलच्या जाहिरातीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

News Desk