HW News Marathi
राजकारण

अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही?

मुंबई | भाजपच्या भोपालमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांच्या शापाने हेमंत करकरे गेले. अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले, त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही? शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तिकीट का दिले? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला विचारला. मुंबईतील भांडुप आज (२४ एप्रिल) राज ठाकरे यांनी सभा पार पडली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हेमंत करकरे ज्या प्रकरणाचा तपास करत होते, तो बॉम्बस्फोटाचा खटला होता आणि दहशतवादाला धर्म असूच शकत नाही आणि अशा माणसाबद्दल विधान करणाऱ्यांना तुम्ही तिकीट देता. हा सत्तेचा माज आहे अशी टीका राज ठाक यांनी केली तसेच जेव्हा ह्यावर टीका सुरु झाली तेव्हा भाजपने हात झटकत सांगितलं की हे विधान आम्हाला मान्य नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे साध्वी प्रज्ञा ह्यांच्या विधानाचे समर्थन करतात असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

मोदी नेहरू आणि इंदिरा गांधी यांचीच कॉपी करत असल्याचा टोला राज ठाकरेंनी मोदींना लगावला. नेहरुंच्याच प्रथमसेवकचे मोदींनी प्रधानसेवक केल्याचे राज म्हणाले. २०१४ मध्ये घरगुती गॅस ४१० रुपयाला मिळत होता, आज साडेसातशे रुपयांना मिळतो. सध्या उज्वला योजनेत फक्त ३० टक्के लोक गॅस घेतात, असे राज म्हणाले.

पुन्हा एकदा राज ठाकरे त्यांच्या व्यापीठावर भाजपच्या आयटीसेलने एका कुटुंबाचे वापरेले फोटो दाखवून जाहीर केली. त्यांना मंचावर बोलविले. तसेच घाटकोपरच्या प्लॉटफ्रॉमवर दुर्घटनेत दोन्ही हात गमविलेल्या मोनिका मोरेला देखील मंचावर बोलवून त्यांना कोणतीच मदत मिळाली नसल्याचे राज ठाकरे सांगत भजपची पोल खोल केली आहे

गॅस दरवाढीवर भाजप नेते विरोधात असताना जी वक्तव्ये करत होते तीच सभेत दाखवून दिली. उज्वला योजनेचा उडालेला बोजवारा त्यांनी सभेतून दाखवून दिला. गॅस दरवाढीने वैतागलेल्या उज्वला योजनेतून गॅस मिळालेल्या लाभार्थींनी चुलीवर जेवण सुरू केल्याचा व्हिडिओच त्यांनी सादर केला. यामध्ये गुड्डीदेवी या पहिल्या लाभार्थी होत्या, त्यांनीही आता चुलीवर जेवण करायला सुरुवात केली आहे.

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • यंदाची ही निवडणूक लोकशाही राहणार की नाही यावर आधारीत आहे.
  • १८ हजार ४२४ जण रेल्वे अपघातात मृत्यू मुखी पडेल हा अकडा भाजप सरकारच्या काळात आला आहे
  • केंद्र तुमची सत्ता आल्यानंतर वाटेत ते होते ते बरे होते, आता जे आहे ते भयानक आहे
  • काँग्रेस हे कमी नालायक होते, आता तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त नालायक निघालात
  • घाटकोपरच्या रेल्वे प्लॉटफ्राम दुर्घटनेत दोनी हात गमविलेल्या मोनिका मोरे हिला मदत केली,
  • देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या नावे तुम्ही मते मागत आहेता. परंतु गेल्या पाच वर्षात तुम्ही केलेल्या कामाबद्दल काहीच बोलत नाही.
  • आजपर्यंत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी कधी सांगितले नाही, भारताचा पंतप्रधान कोण होणार ते, मग आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कसे सांगितले.
  • पाकिस्तानची १० माणसे जरी मरण पावली असती तरी पाकने आमच्या अभिनंदनला सोडले नसते.
  • बालाकोट येथील हल्ल्यानंतर किती माणसे मारली गेली ह्याचा तपशील आमच्याकडे नाही असे एअरचीफ मार्शल सांगत होते
  • मग अमित शाह ह्यांनी २५० माणसे मारली हा आकडा कुठून पैदा केला?
  • भाजप काश्मीरमध्ये युतीमध्ये होती मग तुम्ही काय केलेत ?
  • मी काश्मीरला गेलो होतो, शिकाऱ्यातून फिरून आलो तेंव्हा ती लोके मला भेटायला आली म्हणाली की तुमच्या शब्दाला वजन आहे.
  • तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की काश्मीर मध्ये पर्यटनाला या अन्यथा आम्ही उपाशी मरू. काश्मिरी माणसाला शांतता हवी आहे पण ह्या भाजपाला अशांततेचं राजकारण करायचं आहे
  • हा कसा फकिर हा तर फकरी असे राज ठाकरेंनी काल (२३ एप्रिल) सभेत म्हटले होते
  • देशाचे पंतप्रधान मात्र १६, १६, १७, १८, १९, २० २१ फेब्रुवारीला ते परदेशी दौऱ्यावर फिरत होते
  • १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश हदरला होता.
  • गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल असताना सुद्ध सीआरपीएफचे जवाना त्या रस्त्यावरू का पाठिवले
  • अधी सूचना दिल्या असताना जवानांच्या गाड्या त्या रस्त्याने कशा गेल्या ?
  • मोदी पाच वर्षात सांगितलेल्या योजनांबदल काही बोलत नाही.
  • प्रत्येक कुटूंबात ४ माणसे गृहीत धरली तर साधारणपणे ४० कोटी लोकांचे आयुष्य बदलून गेले असते. पण ह्यांनी काहीच केले नाही फक्त खोटी स्वप्न दाखवली
  • विरोधी पक्षात असताना दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे मोदी म्हणाले होते. म्हणजे ५ वर्षात १० कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते.
  • उज्वला गॅस योजनेत ज्या महिलेला गुड्डी देवी ह्यांना स्वतः ह्या योजनेतील पहिला गॅस दिला.
  • पण पहिल्या सिलेंडरच्या नंतर त्यांना दुसरा सिलेंडर घेणं परवडणे शक्य नाही कारण सिलेंडरच्या किंमती अव्वाच्या सव्वा आहेत.
  • भाजपने उज्ज्वला योजना सुरू केली तरी, लोकांना सबसिड दान केली तरी देखील गॅसच्या किंमत वाढतच आहेत
  • काँग्रेसच्या काळात गॅस ४१० रुपयाला मिळत होता. आज त्याची किंमत ८०० रुपयांपर्यंत गेली आहे
  • काँग्रेसच्या काळात जेव्हा गॅसच्या सिलेंडरचे भाव वाढले होते, तेव्हा भाजपने दिल्लीत अनेक आंदोलन केली होती.
  • एका आठवड्यात साडे आठ लाख संडा बांधली
  • मोदींनी दतक घेतलेल्या वडनगरच्या दयनीय अवस्था पोलखोल राज ठाकरेंनी केली
  • मोदींनी सत्तेत आल्यानंत सांगितले की, प्रत्येक खासदारांनी एक एक गाव दत्तक घ्या.
  • नमामि गंगेच्या प्रकल्पासाठी २० हजार कोटी राखीव केले. गंगा साफ केलीच नाही, फक्त घाट बांधले म्हणजे गंगा साफ झाली असे होत नाही.
  • सरकारच्या योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार रुपये कोटी खर्च केले.
  • लोकांना नोकऱ्या देत नाही, एकही नवीन उद्योग उभा करता आला नाही आणि निव्वळ जाहिरातींवर खर्च करून लोकांना फसवायचा प्रयत्न करता
  • नेहरुंच्याच प्रथमसेवकचे मोदींनी प्रधानसेवक केले
  • मी हरिसाल गावचे सत्य तुमच्या समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या टीमला त्या गावी पाठविली
  • साध्वी प्रज्ञासिंह यांनी भाजप तिकीट कसे ते, ती बाईल काय सिग्नल तोडून आत गेली नव्हती.
  • भाजपकडून तिच्यावर काही कारवाई केली नाही
  • २६/११मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांचे निधन झाले.
  • .
  • भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की माझ्या शापाने हेमंत करकरे गेले. अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही? आणि ह्यावर पुढे जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे साध्वी प्रज्ञा ह्यांच्या विधानाचे समर्थन करतात?
  • हे कुटुंब आहे योगेश चिले, मुर्त्या बनवतो, व्यवसाय आहे
  • हे दाखवताना त्यांनी म्हणलं आहे की मोदींच्या कार्यकाळात हे कुटुंब गरिबी रेषेच्या बाहेर आले.
  • काल मी एक फोटो दाखवला ज्यात भाजपच्या समर्थक फेसबुक पेजने त्या कुटुंबाचा फोटो वापरला.
  • कालच्या शिवडीच्या सभेतला एक विषय अर्धवट राहिला.
  • भाजपच्या लावरी आयटीसेचे एखाद्या कुटुंबाचे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’वर शरद पवारांनी पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया…

Aprna

…म्हणून प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आली ३ वेळा शपथ घेण्याची वेळ

News Desk

स्मारके कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत !

News Desk