HW Marathi
राजकारण

राज ठाकरेंना बजावलेल्या नोटीसीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई |  कोहिनूर मिल ३ खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) नोटीस पाठविण्यात आली आहे. राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रश्न विचारल्यावर म्हटले की, “मला वाटत नाही ईडीच्या चौकशीतून काही निघेत, असे म्हणात. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे.

कॉंग्रेसच्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल कोलते यांनी आज (२१ ऑगस्ट) मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना ईडीकडून बजावण्यात आलेल्या नोटीसबद्दल विचारले. तर ईडीच्या चौकशीतून काही साध्य होईल, असे मला वाटत नाही, म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाठराखण केली.

 

Related posts

सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी

News Desk

#LokSabhaElections2019 : बिहारच्या महाआघाडीचे जागावाटप जाहीर

News Desk

निरंजन डावखरे यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी | शिवाजीराव गर्जे

News Desk