HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई | “एक आणि एक दोन होतात की अकरा ? सध्या ह्याच गणितात झालाय राजकीय चौकीदारांचा बकरा. पूर्वी २ विचारी नेत्यांनी भाजपला घडवलं, आता २ विखारी माणसांनी भाजपला डूबवलं. विचारांची, विवेकाची हरवली शिस्त,आणि जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त”, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या खास शैलीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

दादरमधील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार सुरु होता. यावेळी त्यांच्या प्रचारात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे काही कार्यकर्तेही सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ‘शिवाजी पार्कात एक शून्य दुस-या शून्याला भेटला’ असे म्हणत ट्विटच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला होता. आता मनसेने आशिष शेलार यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार ?

‘शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शून्याला भेटला..गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..पण उपयोग काय ? शून्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय, बाकी शून्यच !
नाही आले “एकनाथराव” भेटीला तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?’, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती.

Related posts

त्या भाजप उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते, धनंजय मुंडेंची बोचरी टीका

News Desk

गोवा भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Gauri Tilekar

भारतात धर्मविरोधी वक्तव्यांवर कारवाई का होत नाही ?

News Desk