मुंबई | कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर काल (२२ ऑगस्ट) त्यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली. यानंतर चक्क आज मनसेने ईडीला नोटीस पाठवली आहे. यासंर्दभात मनसेने ट्विट करत म्हटले की, “महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरले आहे. पण, आम्ही याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.”
“या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझे थोबाड थांबणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला होता. राज ठाकरे काल सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यात पोहोचलेले राज ठाकरे रात्री सव्वाआठच्या सुमारास बाहेर आले. चौकशीनंतर राज ठाकरे कृष्णकुंजवर पोहोचले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. परंतु काही वेळा मनसे ईडीला पाठविलेले नोटीसचे ट्वीट डिलीट केले. ईडीच्या मराठी फलकाबदद्लचे ते ट्वीट का केले गेले. याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही.
मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर @RajThackeray
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 22, 2019
मनसे सुरुवातीपासून महाराष्ट्रात दुकानांच्या नावाचे फलक मराठीत हवे. यासाठी अनेकदा आंदोलन केली आहे. त्यामुळे आता नोटीस पाठवणाऱ्या ईडीलाच मनसेने नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केल्याने मनसे पुढे कोणती भुमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.