HW News Marathi
राजकारण

मोदीजी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, हो किंवा नाही ?

नवी दिल्ली | “मोदीजी तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. जेव्हा तुम्ही राफेलच्या मूळ करारात बदल केले, तेव्हा वायुसेना आणि संरक्षण मंत्रालयाने याबाबत कोणत्या प्रकारचा आक्षेप घेतला होता का ? हो किंवा नाही?” असा थेट सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे. आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे सातत्याने राफेल विमान खरेदी करारावरून पंतप्रधान मोदींना विविध प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘मोदीजी तुमचा पूर्ण आदर ठेवत सांगू इच्छितो कि, आपल्या संस्कृतीत महिलांचा आदर हा घरापासूनच सुरू होतो. त्यामुळे मूळ विषयाला बगल देऊ नका. आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या”, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस महिलांचा अपमान करीत असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली होती. राहुल गांधींनी मोदींच्या या टीकेला ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देत राफेलवरून पुन्हा मोदींना लक्ष्य केले आहे.

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर भाजपच पारडे चांगलेच जड झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘राफेलबाबत देशाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी’,अशी मागणी भाजपच्या सर्व नेत्यांकडून केली जात होती. मात्र, तरीही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत घेऊन राफेलवरून पुन्हा भाजपवर टीका केली होती.

राफेल मुद्द्यावर कायमच काँग्रेस आक्रमक

राफेल विमान कराराला विरोध करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी मोदी सरकारवर वारंवार विविध आरोप केले आहेत. रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट दिल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला फसविल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुखबीर सिंग बादल यांना विचारांची बद्धकोष्ठता । नवज्योतसिंग सिद्धू

News Desk

केजरीवाल-ठाकरे भेटीवरुन नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

Manasi Devkar

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

News Desk