HW Marathi
राजकारण

मोदींचे संसदेतील भाषण प्रथेला धरून नव्हते!

संसदेत लोकसभेच्या अखेरच्या सत्रात अनेक पंतप्रधानांची भाषणे होऊन गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील भाषण हे प्रथेला धरून नव्हते. त्यांच्यावर जसे संस्कार झाले, त्यानुसारच ते बोलले आहेत,अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींवर टीका केली . शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते .

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही; पण याबाबत विचार करून सांगू, असे ही ह्या वेळी पवार म्हणाले. शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची आवश्यकता नाही. माझ्याकडे सहा प्रबळ दावेदार असल्याचे पवारांनी सांगितले .

 

Related posts

प्रियांका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात लढणार ?

News Desk

बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले म्हणून चक्क स्वतःचे बोटच कापले

News Desk

अमित शहा यांची रथयात्रा पुन्हा अडली

News Desk