HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अखेर मोहन जोशी ठरले पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार

पुणे । बहुप्रतीक्षित अशा पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसकडून काल (१ एप्रिल) माजी आमदार मोहन जोशी यांना उमेवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ९ वी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यात पुण्यातून मोहन जोशी आणि रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या उमेदवारांवर सस्पेंस होता. यादरम्यानअरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड आणि सुरेखा पुणेकर यांची नावे पुढे येत होती. परंतु आता मोहन जोशी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. गेल्या चार दशकापासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. मोहन जोशी यांनी पत्रकारितेतून कारकीर्दीला सुरुवात केली होती.

यापूर्वी त्यांनी पुणे युवा काँग्रेस, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्षपदे भूषवले आहे.तर १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभेची निवडणूकही लढवली आहे.  सन १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोहन जोशी यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपाचे प्रदीप रावत विजयी झाले होते.

Related posts

RamMandir : उद्धव ठाकरे अयोध्येसाठी रवाना

News Desk

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk