HW News Marathi
राजकारण

अखेर मोहन जोशी ठरले पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार

पुणे । बहुप्रतीक्षित अशा पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसकडून काल (१ एप्रिल) माजी आमदार मोहन जोशी यांना उमेवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ९ वी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यात पुण्यातून मोहन जोशी आणि रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या उमेदवारांवर सस्पेंस होता. यादरम्यानअरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड आणि सुरेखा पुणेकर यांची नावे पुढे येत होती. परंतु आता मोहन जोशी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. गेल्या चार दशकापासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. मोहन जोशी यांनी पत्रकारितेतून कारकीर्दीला सुरुवात केली होती.

यापूर्वी त्यांनी पुणे युवा काँग्रेस, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्षपदे भूषवले आहे.तर १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभेची निवडणूकही लढवली आहे. सन १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोहन जोशी यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपाचे प्रदीप रावत विजयी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती माझीच क्लीप | मुख्यमंत्री

News Desk

दसऱ्याला पंकजा मुंडे करणार शक्तीप्रदर्शन

Gauri Tilekar

PM Modi in Shirdi LIVE UPDATES | विविध विकासकामांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, मोदी शिर्डी दौ-यावर

News Desk