HW Marathi
राजकारण

ममतांवर टीका करताना मुकुल रॉय यांची जीभ घसरली

नवी दिल्ली | निवडणुकांचे रणनीतीकार आणि जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर हे येत्या विधानसभा निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससाठी काम करणार आहेत. दरम्यान, याविषयी टीका करताना भाजप नेते मुकुल रॉय यांची जीभ घसरली आहे. “प्रशांत किशोर हे आता ममतांना कोणती साडी नेसावी, हे सांगणार का ?”, असे वादग्रस्त वक्तव्य मुकुल रॉय यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरु झाली आहे. दरम्यान, मुकुल रॉय यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या लोकसभेत टीएमसीला बसलेला धक्का ममता बॅनर्जी यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी आतापासूनच जोरदार तयारीला लागल्या आहेत. म्हणूनच येत्या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी त्यांनी प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तीची निवड केली आहे. या निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी यांच्या मदतीसाठी प्रशांत किशोर काम करणार आहेत. प्रशांत किशोर हे एका महिन्यानंतर ममतांसाठी काम करण्यास सुरुवात करतील. याच पार्श्वभूमीवर, मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जींवर खालच्या पातळीची टीका केली आहे.

Related posts

लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावे | सचिन सावंत

News Desk

प्रियांका गांधींनी लावला बैठकांचा सपाटा

News Desk

तब्लिगीच्या उरलेल्या ५० जणांनी स्वत:हून पुढे या, अन्यथा कारवाई करु

News Desk