June 26, 2019
HW Marathi
राजकारण

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालय आज दुपारनंतर देणार निर्णय

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयात आज (११ जानेवारी) दुपारी ३ च्या सुमारास बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर सुनावणी होणार आहे. सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सगल चौथ्या दिवशी देखील कायम आहे. बेस्टचा हा संप या दशकातील सर्वात दीर्घकालीन संप मानला जात आहे. गुरुवारी (१० जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत महापौर बंगल्यावर झालेल्या सात तासांच्या चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शुक्रवारी (११ जानेवारी) संपच सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस असून या संपामुळे मुंबईकरांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपविरोधात अ‍ॅड. दत्ता माने यांनी गुरुवारी (१० जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर असून न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

Related posts

#Results2018 : चंद्रशेखर राव ५० हजार मतांनी विजयी

News Desk

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने ३ राज्यात भाजपने पराभव करुन घेतला ?

News Desk

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु | संजय राऊत

News Desk