HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारने आज पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget )विधानसभेत सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा 2023-24 वर्ष करिता अर्थसंकल्प सादर केले आहे. या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी आणि महिलासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. “लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची…, ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात आणि महिलांसाठी एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट देण्यात आली आहे, अशा अनेक मोठ्या घोषणा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडल्या आहे.

 

दरम्यान, महिलांसाठी एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट देण्यात आली आहे. म्हणजे राज्याच्या परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी
सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पानुसार, आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये, गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये तर  अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करण्यात आली आहे.

जाणून घ्या… अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी या मोठ्या घोषणा

  •  मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
  •  पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
  •  जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
  •  पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
  •  अकरावीत 8000 रुपये
  •  मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
  •  राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
  •  चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
  •  महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
  •  मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
  • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
  • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
  • गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
  • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
  • अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
  • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
  • अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

 

Related posts

महिला राखीव प्रवर्गातून तृतीय पंथीय अंजली पाटील विजयी

News Desk

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Aprna

मोठ्या मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार, गडकरींचा विश्वास

News Desk