HW Marathi
राजकारण

पाकिस्तान सीमेवर वाढत आहे मुस्लिम लोकसंख्या !

जयपूर | राजस्थान येथील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमारेषेच्या भागात मुस्लिमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सीमा सुरक्षा दलाने यासंदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने काळजी व्यक्त केली आहे.

राजस्थाच्या या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या २२ ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतर समाजाची लोकसंख्या वाढ फक्त ८ ते  १० टक्क्यांनी झाली आहे. त्यामुळे  सिमा सुरक्षा दलाने गृहमंत्रालयाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सदर ठिकाणी मुस्लीम लोकसंख्या वाढली असली तरी येथील हिंदू-मुस्लीम समाजात तेढ नाही. दोन्ही समाज एकोप्याने राहतात, असे ही बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, सिमा सुरक्षा दलाने जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सर्वेक्षण केले होते. त्यातून ही माहिती समोर आली आहे. भारत पाकचे तणावपुर्ण संबंध पाहता मुस्लिम जनसंख्या वाढत असताना भारताने  विषेश काळजी घेणे गरजेचे आहे.

Related posts

राजेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी केले निंबाळकरांच्या पुतळ्याचे दहन

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk

पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल !

News Desk