नवी दिल्ली | “धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहणार “, असे म्हणत कर्नाटकातील बंगळुरू मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अभिनेते प्रकाश राज जवळपास आपला पराभव गृहीत धरला आहे. प्रकाश राज हे सध्या पिछाडीवर आहेत. “मला सणसणीत चपराक बसली आहे. माझ्यावर जेवढी जास्त टीका केली जाईल, जितका माझा अपमान केला जाईल तेवढाच जास्त ताकदीने मी धर्मनिरपेक्ष भारतासाठी लढेन”, असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.
a SOLID SLAP on my face ..as More ABUSE..TROLL..and HUMILIATION come my way..I WILL STAND MY GROUND ..My RESOLVE to FIGHT for SECULAR INDIA will continue..A TOUGH JOURNEY AHEAD HAS JUST BEGUN ..THANK YOU EVERYONE WHO WERE WITH ME IN THIS JOURNEY. …. JAI HIND
— Prakash Raj (@prakashraaj) May 23, 2019
“माझ्या गालावर सणसणीत चपराक बसली आहे. माझ्यावर जेवढी जास्त टीका केली जाईल, जितके ट्रॉल केले जाईल, जितका अपमान केला जाईल तेवढे जास्त ताकदीने मी धर्मनिरपेक्ष भारतासाठी लढा सुरु ठेवेन. पुढच्या खडतर प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. या प्रवासात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे खूप-खूप आभार”, अशा आशयाचे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.