HW News Marathi
राजकारण

येत्या तीन दिवसांत कर्नाटकात भाजपचे सरकार येईल, राम शिंदेंचा दावा

नवी दिल्ली | कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. २ अपक्ष आमदारांनी आज (१५ जानेवारी) राज्यातील काँग्रेस-जेडीएस यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. दरम्यान, यानंतर महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केलेले वक्तव्य मोठ्या चर्चेत आले आहे. “येत्या तीन दिवसांत कर्नाटकात भाजपचे सरकार येईल”, असा दावा राम शिंदे यांनी केला असून भाजप हा कर्नाटकातील मोठा पक्ष असल्याचा दावा देखील राम शिंदे यांनी केला आहे.

२ अपक्ष आमदारांनी काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. मात्र, कुमारस्वामी याबाबत अत्यंत निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे. “दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर काय संख्याबळ राहते ? यामुळे आम्हाला फार फरक पडत नाही. मी निश्चित असून मला माझी क्षमता माहिती आहे. गेल्या आठवड्याभरापासून प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा मी आनंद घेत असल्याचे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे”.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लक्ष्मीकांत खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी

Gauri Tilekar

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदींचा भाजपमध्ये प्रवेश, पंजाबमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

News Desk

‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल | ठाकरे

News Desk