HW News Marathi
राजकारण

नाणार प्रकल्पासाठी काहीच आठवड्यात जमीन मिळणार, यूएईच्या राजदूतांची माहिती

नवी दिल्ली | “नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी काही आठवड्यातच आम्हाला राज्य सरकारकडून जमीन मिळणार आहे”, असे यूएईचे राजदूत अहमद अल्बाना यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. दरम्यान,’भूसंपादनाला सध्या राज्य सरकारने स्थगिती दिली आहे’, अशी माहिती बुधवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली होती. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण होऊन मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या प्रकल्पाला अनेक पर्यावरणवाद्यांचा त्याचप्रमाणे शिवसेनेचा तीव्र विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या भूमी संपादनाला स्थगिती दिली होती. मात्र, ‘भारत-यूएई-सौदी अरेबिया यांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी काही आठवड्यातच जमीन मिळेल’, असे यूएईच्या राजदूतांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 17 ऑक्टोबरला होणार सुनावणी

Aprna

प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत !

News Desk

आता विधानसभा लढवा…अन् त्यानंतरच राजकारणातून संन्यास घ्या !

News Desk