HW News Marathi
राजकारण

नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ आगामी लोकसभा निवडणूक लढविणार

मुंबई | भाजप खासदार नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि नारायण राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणेंच्या सोमवारी झालेल्या भेटीत यावेळी जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी “नारायण राणेंना भाजपकडून देण्यात आलेली खासदारकी काढून घेण्यात यावी”, अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली होती.

नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्षाकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा-कोल्हापूरमधील प्रत्येकी एक, सोलापूर एक आणि औरंगाबादमधील या पाच जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी भाजपच्याच कोट्यातून राज्यसभेचे खासदार असणाऱ्या नारायण राणेंनी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेच्या वेळी भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे भाजपमध्ये नारायण राणेविरोधी वातावरण होते. म्हणूनच भाजपकडून नारायण राणेंना देण्यात आलेली खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी सध्या सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांकडून केली जात होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युद्ध नसताना जवान का शहीद होतात !

News Desk

अमेठीतून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

भटिंडामधील मतदान केंद्रावर गोळीबार

News Desk