नवी दिल्ली | राफेल विमान खरेदी करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर वारंवार आरोप करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आता स्वतःच्याच एका विधानामुळे अडचणीत आले आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे.
National Commission for Women (NCW) issues notice to Congress President Rahul Gandhi over his statement "PM ran away & asked a 'mahila' (Defence Minister Nirmala Sitharaman) to defend him" pic.twitter.com/xTAyqNeXg1
— ANI (@ANI) January 10, 2019
राजस्थानच्या जयपूरमधील किसान रॅलीमध्ये बोलताना राहुल गांधींनी राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान एका महिलेमागे लपत आहेत, असे विधान राहुल गांधी यांनी यावेळी केले होते.
“५६ इंचाची छाती असलेला चौकीदार पळून गेला आणि एका महिलेला म्हणाला कि मला वाचवा. मी स्वतःला वाचवू शकत नाही, मला वाचवा”, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. या वक्तव्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली.
आम्ही राहुल गांधींकडे त्यांच्या त्या वक्तव्यबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांचे वक्तव्य चुकीचे होते. म्हणूनच आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे”, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.