HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई | १७व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी आज (१५ मार्च) यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने ५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बहुचर्चित अशा मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ  पवार तर शिरूर मतदारसंघातून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माढा, अहमदनगर आणि गोंदिया या मतदार संघातील उमदेवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीने काल (१४ मार्च) राष्ट्रवादीने पहिल यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये महाराष्ट्रातील १० आणि लक्षद्वीपमधील १ अशा ११ नावांची घोषणा करण्यात आली होती.

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

  • धनराज हरिभाऊ महाले –  दिंडोरी
  • समीर भुजबळ – नाशिक
  • डॉ. अमोल कोल्हे – शिरूर
  • बजरंग सोनावणे – बीड
  • पार्थ अजित पवार – मावळ

 

 

 

Related posts

#Budget 2019 : सरकारकडून असंघटित कामगारांना मिळणार पेन्शन

News Desk

टिपू सुलतानच्या जयंतीला कर्नाटकात विरोध, २ शहरात जमाव बंदी

News Desk

मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करावा | नीलम गो-हे

News Desk