HW News Marathi
राजकारण

तासगाव नगरपालिकेसमोर भर पावसात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे उपोषण

सांगली | तासगांव शहराममध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे नियम धाब्यावर बसवून नळाला चंबळ कंपनीचे मीटर बसवले आहेत. चंबळ कंपनीचे मीटर लावण्यात येऊ नयेत व पाणीपुरवठा विभागाची जॅकवेलचा ठेका पद्धत रद्ध करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजल्या पासून राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक भर पावसात उपोषणाला बसले होते. तासगांव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाअधिका-यांनी देखील या उपोषणाला यावेळी पाठिंबा दर्शविला.

काय आहे प्रकरण

तासगाव नगरपालिकेने चंबळ कंपनीचे पाणी मीटर खरेदी केले आहेत. खरेदी केलेल्या एकूण मीटरची संख्या दोन हजारच्या आसपास आहे. त्यात लाखोंचा भष्टाचार झाला आहे असा आरोप नगरसेवक बाळासाहेब सावंत व अभिजित माळी यांनी केला आहे. चंबळ कंपनीचे पाणी मीटर हे बोगस आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे नियम धाब्यावर बसवून मीटर बोगस खरेदी केले आहेत मुळात हे मीटर बाजारात ३९० रुपयाला येते मात्र नगरपालिकेने जनतेच्या नळाला १०४० ला रुपयाला बसवले आहे.

तासगाव शहरात एकुण १००६ मीटर बसवले आहेत. हे मीटर अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. हे मीटर पाणी येण्याअगोदर हवा येते हवा आली की मीटर फिरू लागतात तासगाव शहरात पाण्याच्या टाक्या तीन आहेत.भाजपाने सांगितले चोवीस तास पाणी देऊ पण पाणीही पुरेसे देऊ शकत नाहीत या मीटरमध्ये लाखोचा भष्टाचार झाला आहे. यात भाजपाचे नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यांचा हात आहे असा आरोप नगरसेवक अभिजीत माळी व बाळासाहेब सावंत यांचा आहे.

जॅकवेलचा ठेकाही दिड कोट रुपायाला देण्यात आला आहे नगरपालिका सर्व ठेके देऊन कर्मचा-यांना नक्की काय काम लावणार आहे असा सवालही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. जॅकवेलच्या ठेक्यात ही लाखोचा घोटाळा झाला आहे या घोटाळय़ात कर्मचारी व नगरसेवकांचा हात आहे असा आरोप अभिजीत माळी व बाळासाहेब सावंत यांचा आहे

याची सखोल चौकशी व्हावी यासाठी एक दिवसाचे नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत, अभिजित माळी, वैभव भाट, तानाजी पवार, नगरसेविका पद्मिनी जावळे, प्रतिभा लुगडे, निर्मला पाटील, सादिया शेख सहभागी होत्या. या उपोषणात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल काळे शहरप्रमुख संजयदाजी चव्हाण यानी पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष हणमंतआप्पा देसाई,शहरअध्यक्ष अमोल शिंदे,युवकचे कमलेश तांबेकर,स्वप्निल जाधव,करण पवार,सचिन पाटील,परेश लुगड़े बशीर मोमिन महिला शहराध्यक्षा साळूंखे वहिनी, पूनम माळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात

News Desk

राहुल गांधींच ‘डबल ए’ तर सीतारामन यांचे ‘आरव्ही’

News Desk

भाजपचा मोठा विजय

News Desk