HW News Marathi
राजकारण

डिजिटल व्यवहारासंबंधी फसवणूकीवर बंदी घालण्यासाठी आरबीआयचे नवे नियम लागू

नवी दिल्ली | डिजिटल व्यवहाराशी जोडणारा नवा नियम आरबीआयने आजपासून लागू केला आहे. डिजिटल व्यवहाराशी संबंधित फसवणूकीवर बंदी घालण्यासाठी आरबीआयचे नवे नियम आजपासून (१६ मार्च) लागू झाले आहेत. हे नियम डेबिट आणि क्रेडिट कार्डचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी मदत करतील. आरबीआयने या संदर्भातील सूचना जानेवारी २०२० मध्ये जारी केली होती. हे नियम सर्व डेबिट-क्रेडिट कार्ड ( फिजिकल आणि व्हर्चूअल) वर लागू होतील. दरम्यान, हे नवीन नियम प्रीपेड गिफ्ट कार्ड्स आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेने बँकांना डेबिट-क्रेडिट कार्ड जारी करताना केवळ भारतात एटीएम आणि पॉईंट ऑफ सेल टर्मिनलवर व्यवहार करण्यासाठी सक्रिय करण्यास सांगितले आहे. आरबीआयच्या नव्या नियमानुसार आता फक्त एटीएम आणि पीओएस टर्मिनल्सवर डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची परवानगी दिली जाईल. ग्राहकांना ऑनलाइन ट्रांजेक्शन किंवा आंतरराष्ट्रीय ट्रांजेक्शन करायचे असतील तर या सेवांचा लाभ घेण्यासाठी या सेवा चालू कराव्या लागतील. डेबिट-क्रेडिट कार्ड ग्राहकांनी कोणतेही ऑनलाइन ट्रांजेक्शन, कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्शन किंवा आंतरराष्ट्रीय ट्रांजेक्शन केले नाही तर कार्डवरील या सेवा १६ मार्चपासून आपोआप बंद होतील.
रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सात दिवसात मोबाइल एप्लीकेशन, लिमिट मोडिफाय करण्यासाठी बॅंकेने पर्याय आणि इनेबल व डिसेबल उपलब्ध करण्यास सांगितले आहे. जर ग्राहक आपल्या कार्डच्या स्टेट्समध्ये काही बदल करत असेल किंवा दुसरे काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर बँक एसएमएस / ईमेलद्वारे ग्राहकांना माहिती देणार आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का ?

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेडून मंजूर

Aprna

उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

News Desk