मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबई विशेष न्यायालयाकडून मोठा दणका दिला आहे. दर आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर होण्याच्या न्यायालयाच्या आदेशातून कायमस्वरूपी सूट मिळण्याकरिता प्रज्ञा ठाकूर यांनी दाखल केलेली याचिका मुंबईच्या एनआयए न्यायालयाने पूर्णपणे फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई विशेष न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना गुरुवारी (२० जून) न्यायालयात हजर राहण्यास सूट दिली आहे.
However, the Special NIA Court in Mumbai has given Pragya Thakur an exemption for today from attending the court. https://t.co/AqQsdrx5RT
— ANI (@ANI) June 20, 2019
प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाने ३ जून रोजी आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश दिले होते. यात आदेशात सूट देण्याची मागणी करणारी याचिका प्रज्ञा ठाकूर यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांची ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे, आता न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे साध्वी प्रज्ञा यांना आठड्यातून एकदा न्यायालयात हजर राहणे बंधनकारक असणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळमधून काँग्रेस ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.