राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. यानंतर उद्धव ठाकरेंना शिंदेंनी अनेक धक्के दिले. आमदारांपाठोपाठ अनेक खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अनेकांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं.
दरम्यान “एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती.” असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावर आता नितेश राणे यांनीही एक ट्विट केलं आहे.
Just like Eknath Shinde ji .. several “suparis”were given to finish my father when he left the Sena.. by the so called sober and decent Paksha Pramukh!
Let the meow meow finish.. then we will start with the “Vastraharan” with interest 😊— nitesh rane (@NiteshNRane) July 23, 2022
काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये?
नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करु असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.