HW Marathi
राजकारण

गडकरीच पंतप्रधान, ज्योतीषांनी वर्तविले भविष्य

अमरावती येथील ज्योतिष्य परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी वर्तविली आहे. ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तविली आहे.

भाजपाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळणार नाही. मात्र भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीने सहकार्याने सत्ता स्थापन करावी लागेल, असे झाल्यास नितीन गडकरींना पंतप्रधान म्हणून मिळेल अशी भविष्यवाणी या भविष्य परिषदेत वर्तवण्यात आली. गडकरी यांच्या ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे २०१९ मध्ये त्यांना सर्वात मोठी संधी आहे असेही यामध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही हे गडकरींनी अनेकदा सांगितले आहे. तरीही नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे दावेदार असतील का? अशा चर्चा याआधीही राजकीय वर्तुळात आहे.

Related posts

“हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार”, शिवसेनेचा नवा नारा

News Desk

काँग्रेसच्या महासिचवांच्या बैठकीत प्रियांका गांधींची उपस्थिती

News Desk

विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही !

News Desk