HW News Marathi
राजकारण

नितीन गडकरींनी नौदलाची माफी मागावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

मुंबई : प्रतिनिधी एक इंचही जमिन नौदलाला देणार नाही,नौदलाने मुंबईत राहण्याऐवजी पाकीस्तानच्या सीमेवर जावे असे मग्रूर उद्गार काढणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाची बिनशर्त माफी मागावी व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

भाजपचे मुंबई सचिव प्रकाश रेड्डी यांनी ही मागणी केली आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मुंबईचा समुद्रकिनारा व एकंदरीत समुद्रकिनारे संरक्षित असले पाहीजे. त्याबाबत नौदलाचे मत लक्षात घेतलेच पाहीजे.ते सोडून नौदलाला पाकीस्तानच्या सीमेवर जा, असे सांगणे म्हणजे गडकरींनी दुसऱ्या कसाबला निमंत्रण देण्यासारखे आहे, असा आरोप रेड्डी यांनी केला आहे.

मुळात ही जमिन गडकरींच्या खासगी मालकीची नाही. ही जमीन कॉर्पोरेट सेक्टरला, पंचतारांकीत तरंगती हॉटेल्स,कॅसिनो, काळ्या पैसेवाल्या उच्चवर्गीयांच्या खाजगी बोटी साठी जेटी बांधून यांना टुरीझमच्या नावाखाली देण्याचे गडकरींचे कारस्थान आहे, असे असताना नौदलावर टीका करण्याचे काही प्रयोजन नव्हते. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीचा वापर करण्यासाठी पारदर्शक प्रक्रीया राबवण्याची गरज आहे.

त्यासाठी गडकरींनी फतवे काढण्याची गरज नाही, असे रेड्डी यांनी सुनावले आहे. देशभक्तीसाठी सैन्यदलाचा,नौदलाचा वारंवार उपयोग करणऱ्या आरएसएस स्वयंसेवक असलेल्या गडकरींचे बेगडी व खरे स्वरूप या नौदलाबाबत केलेल्या विधानाने जनतेसमोर आले आहे. त्यांना देशाच्या संरक्षणापेक्षा पंचतारांकीत तरंगत्या हॉटेलवाल्यांचे कॅसिनोवाल्याचे हित जास्त प्रिय आहे, हे दुर्दैवी आहे. नौदलावर केलेल्या टीकेबाबत गडकरींनी नौदलाची माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट! –  नाना पटोले

Aprna

रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Aprna

राज्यसभेत निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्याकडे काँग्रेसने सोपवली ‘ही’ जबाबदारी

Aprna