HW Marathi
राजकारण

आघाडीत एमआयएम, मनसेला स्थान नाही!

पुणे | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी काँग्रेसने महाआघाडीची घोषणा केली . मात्र या आघाडीत एमआयएम, मनसे यांना कोणतेही स्थान नाही. आमच्या मित्र पक्षाकडूनही त्यांच्यासाठी नकारच आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.

पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत आले तर आनंदच होईल मात्र त्यांना एमआयएमची साथ सोडावी लागेल. पुण्याची जागा आमचीच असून ती आम्ही लढवू. निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे, निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली दावेदारी सांगितली असली तरीही आम्ही येथील जागांसाठी आग्रही असल्याचे चव्हाण म्हणाले.

Related posts

उद्धव ठाकरेंची पुन्हा स्वबळावर लढण्याची घोषणा

Gauri Tilekar

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk

मुख्यमंत्री पर्रीकर करणार लवकरच कामकाजाला सुरुवात !

Gauri Tilekar