HW News Marathi
राजकारण

एखाद्याला आलेला झटका हे राज्याचे धोरण नव्हे | राज ठाकरे  

मुंबई | मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय जनतेसाठी त्रासदायक ठरला होता. तसेच मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा राज्यसरकारने घेतलेला निर्णय लोकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. एखाद्या मंत्र्याला प्लास्टिक बंदीचा आलेला झटका हे राज्याचे धोरण नाही असा टोला राज यांनी रामदास कदम यांना लगावला. मंगळवारी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज बोलत होते.

प्लास्टिक बंदीला मनसेचा विरोध असल्यामुळे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती. आजच्या पत्रकार परीषदेत बोलताना राज यांनी माझा विषय सरकारशी संबंधित आहे कोणीही तो नात्याशी जोडू नये असा सल्ला रामदास कदम यांना दिला आहे. तसेच स्वच्छ भारतच्या नावावर लोकांकडून सरकारने पैसे लाटल्याचा राज यांनी सरकारवर आरोप केला आहे.

प्रत्येक देशाला असे अनेक विषय भेडसावतात, त्या देशांनी काय उपाय योजलेत याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. कोणत्याही उपक्रमा बाबत या सरकारचे ठोस धोरण नसल्याचेही राज यावेळी म्हणालेत. विकास आणि महापालिका धोरण काय असते हे पहाण्यासाठी नाशिकला जाऊन या असा सल्ला राज यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना दिला.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परीषदेतले महत्वाचे मुद्दे

  • अनअधिकृत झोपडपट्यांवर कोणता दंड आहे ?
  • लोकांना प्लास्टिक टाकण्यासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे का ?
  • मुंबईत आलेले स्टीलचे बस स्टॉप एका रात्रीत चोरीला गेले, त्याची चौकशी कोण करणार?
  • महिन्याभरात ही प्लास्टिक बंदी शिथील होईल
  • मंत्री प्रत्येक दुकानात जाऊन बघू शकत नाही
  • नोट बंदी केल्यानंतर एटीएममध्ये २ हजारची नोट बसत नसल्याचे सरकारले कळले
  • अनेकांना कचरा कुंडीत कचरा टाकायचा आहे त्यांना कचरा कुंड्या महापालिकेने दिलेल्या नाहीत
  • लोकांना सुविधा पुरवा मग दंड आकारा
  • प्रत्येक देशाला असे अनेक विषय भेडसावतात, त्या देशांनी काय उपाय योजलेत याचा अभ्यास होणे गरजेचे
  • नागरीकांनी प्लास्टिकचा वापर योग्य पद्धतीने करावा
  • आपण आपल्या घराप्रमाणे परीसर स्वच्छ ठेवणे गरजेचे
  • जबाबदारीने जनतेने तसेच सरकारने वागणे आवश्यक
  • महापालिकेची चूक दाखवून देताना संदिप देशपांडे यांनी कंत्राटदाराला खड्यात उभे केले होते, सरकारला त्यांच्या कामाची आठवण करुन देणे गरजेचे आहे
  • सरकारने स्वताची कामे नीट करावीत
  • प्लास्टिकला पर्याय न देता दंड कसला आकारता असा सवाल उपस्थित केला
  • नाशिकमध्ये जाऊन रामदास कदमांनी बघावे विकास काय असतो
  • बिल्डरांना जागा विकतात म्हणून डंपिंग ग्राऊंड वेळोवेळी बदलले जाते
  • दंड आकारणा-यांना विचारा सरकारने स्वताचे काम केले आहे का मगच त्यांना दंड द्या
  • एखाद्या मंत्र्याला आलेला झटका हे राज्याचे धोरण नव्हे
  • नद्या पहिल्या स्वच्छ करा, नंतर प्लास्टिक बंद करा. राज यांचा सरकराला सल्ला
  • महापालिकेने स्वताचे काम नीट करावे मग लोकांना अक्कल शिकावावी
  • या बंदी मागे राजकीय धोरण आहे का हे पहाणे गरजेचे
  • थर्माकोलवरची बंदी काढली. सरकारकडे धोरण नावाची बाब आहे का
  • स्वच्छ भारतच्या नावावर लोकांकडून सरकारने पैसे लाटले, राज ठाकरेंचा मोदी सरकारवर आरोप
  • पंतप्रधानांच्या मतदार संघातली नदी अद्याप साफ झााली नाही
  • लोकांच्या घरात तोंड घालण्यापेक्षा स्वताकडे पहाणे गरजेचे आहे, सरकारला मोलाचा सल्ला
  • महापालिकेने स्वताचे काम नीट करावीत
  • जनतेकडून दंड घ्यायचा असेल तर, महापालिका रोड टॅक्सच्या नावे पैसे घेते तर त्यांनी उत्तम रस्ते द्यावेत
  • पर्याय लोकांनी नेहमी स्वीकारले आहेत, पण जनतेला पर्याय देणे गरजेचे
  • दंड भरु नका, राज यांचे जनतेला आवाहन
  • माझा विषय सरकारशी संबंधित आहे कोणीही तो नात्याशी जोडू नये
  • रामदास कदम यांची बुद्धी इवलीशी
  • निर्णय पर्यावरण मंत्र्यांचा आहे त्यांनी याबाबत उत्तर द्यावीत
  • वैयक्तीक नातेसंबंध मध्ये आणून उगीच दुसरीकडे हा विषय घेऊन जाऊ नये
  • मुख्यमंत्र्यांना वाटत तर त्यांना नाणार प्रकल्प गुजरातला घेऊन जावा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वर्षा’ निवासस्थानी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानींची भेट; राज्यात चर्चेला उधाण

Aprna

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे

News Desk

“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको,” मुख्यमंत्र्यांचे आदेश

Aprna