नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये म्हटलेय की, “राहुल गांधी यांचे नाव एका ब्रिटीश कंपनीच्या कागदपत्रांमध्ये सापडले असून या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीवर राहुल गांधी यांनी अधिक खुलासा करावा असे सांगण्यात आले आहे.” राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Ministry of Home Affairs issues notice to Congress President Rahul Gandhi over his citizenship after receiving a complaint from Rajya Sabha MP Dr Subramanian Swamy; MHA asks Rahul Gandhi to respond in the matter within a 'fortnight'. pic.twitter.com/rkFu6TJ7lu
— ANI (@ANI) April 30, 2019
इंग्लंडमध्ये बॅकऑप्स नावाच्या कंपनीची २००३ साली नोंदणी झाली होती. हँपशायर भागात या कंपनीचे कार्यालय असून या कंपनीचे संचालक आणि सचिव अशा दोन पदावर राहुल गांधी विराजमान असल्याचे तक्रारीत म्हटले गेले आहे. या कंपनीने केलेल्या वार्षिक करभरण्यामध्ये राहुल गांधी यांनी त्यांची जन्मतारीख १९ जून १९७० असल्याचे सांगितले आहे. या कागदपत्रांमध्ये राहुल यांनी आपले नागरिकत्व हे ब्रिटीश असल्याचे म्हटल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावत आहेत. अमेठीमध्ये त्यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.