HW News Marathi
राजकारण

आता एमआयएम करणार हर्षवर्धन जाधवांच्या मदतीची परतफेड

मुंबई | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी कन्नड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमच्या पाठिंब्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची ताकद वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. कन्नडचे विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव विरुद्ध शिवसेना उमेदवार उदयसिंह राजपूत अशी लढत होणार होती. मात्र, आता किशोर पवार यांनी उदयसिंह राजपूत यांच्याविरूद्ध बंडखोरी केल्याने या मतदारसंघात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिल्यानेच शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याची जोरदार टीका शिवसेनेकडून झाली. याच पार्श्वभूमीवर, लोकसभेत हर्षवर्धन जाधवांनी एमआयएमला केलेल्या त्या मदतीची परतफेड म्हणूनच आता एमआयएमकडून हर्षवर्धन जाधव यांना विधानसभेकरिता मदत केली जात असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टोकाच्या टीकेमुळे हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात कन्नड पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर बुधवारी (१६ ऑक्टोबर) रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला झाला. हा अज्ञाताच्या हल्ल्यात त्यांच्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. तसेच जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. आपल्या घरावर झालेला हल्ला हा शिवसैनिकांनी केल्याचा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार !

News Desk

जनतेनेच भाजपला रामनाम सत्य केलेय । नवाब मलिक

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपच्या ४२ स्टार प्रचारकांची नावे जाहीर

News Desk