नवी दिल्ली | “आम्ही ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर लढविली. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटबंदी, जीएसटी, भ्रष्टाचार यांसारख्या यांसारख्या जनतेच्या प्रश्नांवर आम्ही ही निवडणूक लढविली. त्यामुळे आता जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. ही लढत चांगली झाली. मोदींनी द्वेषाने तर आम्ही मात्र प्रेमाने ही लढाई लढली. यात प्रेमाचाच विजय होईल, माझी खात्री आहे”, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Congress President Rahul Gandhi after casting his vote: The election was fought on key issues including demonetization, farmer problems, Gabbar Singh Tax and corruption in #Rafale. Narendra Modi used hatred in the campaign and we used love and I am confident love will win pic.twitter.com/gE1BgvQzPc
— ANI (@ANI) May 12, 2019
लोकशाहीत जनता हीच मालक असते. आम्ही यंदाची निवडणूक जनतेशी संबंधित मुद्द्यांवर लढवली आहे. त्यामुळे जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी बोलत होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.