HW News Marathi
राजकारण

आता डान्सबारमध्ये प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक ?

मुंबई | राज्य सरकारकडून डान्स बारवर घालण्यात आलेले आलेले अनेक नियम आणि अटी रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील डान्स बारवरील बंदी उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य सरकारकडून आता डान्सबार बंदीच्या कायद्यात बदल करण्यात येणार असून काही नवीन नियम बनविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

बारच्या डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही असावेत ही राज्य सरकारची अट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता सुरक्षेच्या कारणास्तव डान्सबारमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला आपले ओळखपत्र दाखवावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. ओळखपत्राद्वारे त्या व्यक्तीचे तपासून नंतरच त्या व्यक्तीने डान्सबारमध्ये प्रवेश करण्यास दिले जाईल, अशी माहिती मिळत आहे.

डान्सबार कायद्यात अनेक महिलांचे शोषण रोखण्याचा प्रयत्न त्याचप्रमाणे त्याची सुरक्षितता या बाबींचा विचार करण्यात आला होता असे राज्य सरकारने म्हटले आहे. मात्र, त्यांपैकीच अनेक अटी-नियम सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालायने रद्द केले डान्स बारचे नियम

  • डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम रद्द
  • बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अट शिथिल
  • बारबालांना टीप न देण्याची राज्य सरकारची अट रद्द
  • बारबालांना टीप देण्यास परवानगी मात्र बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत
  • बारबालांना डान्स बारमध्ये अश्लील नृत्य करण्यास मनाई
  • डान्स बारमध्ये दारु पिण्यावर राज्य सरकारने घातलेली बंदी उठवली
  • महाराष्ट्रात संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत डान्स बार सुरु राहणार
  • डान्स बार हे धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर ठेवण्याची अटही मागे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; भाजप आणि ‘मविआ’ची प्रतिष्ठा पणाला

Aprna

“बेळगाव महाराष्ट्रात यावे, यासाठी नवस का केला जात नाही?”, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Aprna

११ वाजेपर्यंत राजस्थानात २२ तर तेलंगणात २३ टक्के मतदानाची नोंद

News Desk