HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय ? मारायचे की सोडायचे ?, पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

नागपूर | “इंद्र देव फार बदमाश आणि लालची होता. त्याच्यावर संकट आले कि मात्र तो मोठ्या देवांकडे धावायचा. इथे तर राज्यात आणि देशात दोन्ही इंद्र आहेत. आता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय ? मारायचे की सोडायचे ? ते तुम्हीच ठरवा”, असे वादग्रस्त वक्तव्य करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत नाना पटोले बोलत होते.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरला आहे. नागपूर मतदारसंघातून नाना पटोले यांची लढत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी नागपूरमधून काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यादृष्टीने काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु झाला आहे. याच दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असतात नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पटोले यांच्या या टीकेमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Related posts

आज देशभरात महाराष्ट्रासह ९ राज्यातील ७१ मतदारसंघासाठी होणार मतदान

News Desk

भिडेंना अटक झाली नाहीतर विधान भवनाला घेराव घालू | प्रकाश आंबेडकर

अपर्णा गोतपागर

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचा आरोप

News Desk