श्रीनगर | जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२१ एप्रिल) येथील राजस्थानमधील बारमेर येथे जाहीर सभेत ते म्हणाले की, आमच्या ताफ्यात असणारी अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी ठेवले का? या विधानाने पाकिस्तानला धमकी वजा इशारा दिला आहे. नेहमीच वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनी मोदींच्या विधानानंतर आज (२२ एप्रिल) ट्वीट करत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
If India hasn’t kept nuclear bomb for Diwali, it’s obvious Pakistan’s not kept theirs for Eid either. Don’t know why PM Modi must stoop so low & reduce political discourse to this.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) April 22, 2019
पंतप्रधान मोदी दर दुसऱ्या दिवशी बोलता म्हटले की, आमच्याकडे देखील अणूबॉम्बचे बटन आहे. परंतु नंतर काय? जर भारताने अणूबॉम्ब दिवाळीसाठी ठेवला नसेल तर पाकिस्तानने देखील त्यांच्याकडील अणूबॉम्ब ईदसाठी ठेवलेला नसेल हे स्पष्ट आहे. आता बराबरीचा हिशोब असणार आहे. याआधी देखील कलम ३७० वरून मेहबुबा मुफ्ती यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. कलम ३७० रद्द केल्यास जम्मू-कश्मीर भारतापासून वेगळा होईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
मोदी सभेत नेमके काय म्हणाले
राजस्थानमधील बारमेर येथे रविवारी (२१ एप्रिल) विराट सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, पाकिस्तानला घाबरण्याची निती सोडून दिली आहे. पूर्वी पाकिस्तान अणूहल्ल्याची धमकी देत होता. आमच्याकडेही अण्वस्त्रे आहेत आणि ते काय दिवाळीसाठी ठेवलेले आहे का? असा सलाव करून मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला होता. मोदींच्या या वक्तव्यावर मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी एक ट्वीट केले आणि याच ट्वीटवरून नवा वाद सुरू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.