HW News Marathi
राजकारण

विधानसभेला युती निश्चित, लवकरच होणार अधिकृत घोषणा

मुंबई । आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आता सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. वारंवार “आमचं ठरलंय” असे सांगणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत गेले अनेक दिवस संभ्रम कायम होता. मात्र, आता अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘युती होणार की नाही ?’ या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. आगामी विधानसभेकरिता भाजप, शिवसेना, रिपाई आणि अन्य मित्रपक्षांची महायुती झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

“आगामी विधानसभा निवडणुकीकरिता शिवसेना, भाजपा , रिपाई आणि अन्य मित्रपक्षांची महायुती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः लवकरच महायुतीची अधिकृत घोषणा करतील”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र स्पष्ट केलेला नाही. महायुती निश्चित असून त्यांच्या अधिकृत घोषणेदरम्यानच जागावाटपाचा फॉर्म्युला समजेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपद आणि जागावाटप या २ मुद्द्यावर अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे चित्र असताना हे दोन्ही पक्ष आता हा तिढा कसा सोडवणार ?, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेआहे. येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभेकरिता मतदान प्रक्रिया पार पडणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता शिवसेनेची यादी देखील मुख्यमंत्रीच तयार करतील !

News Desk

INX Media Case : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्य सचिवांकडे सुपूर्द

News Desk