HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

जमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले !

मीरत (उत्तर प्रदेश)  | जे लोक ७० वर्षात गरिबांचे बँकेत खाते उघडू शकले नाहीत, ते लोक आता गरिबांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित करत काँग्रसवर निशाणा साधला. मोदींनी आज (२८ मार्च) उत्तर प्रदेशातील मेरठ येथे शंखनाद येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

मोदींनी उपस्थित करताना म्हटले की, जमीन, आकाश अंतराळ, सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने करून दाखविले, असा दावा केला. आम्हाला पुरावा हवा की वीरपुत्र? माझ्या देशाचा वीरपुत्र हाच माझ्या देशाच्या मोठा पुरावा आहे. जे पुरावा मागतात; ते वीरपुत्राला आव्हान देतात, अशा शब्दांत मोदी यांनी टीकास्त्र सोडले.

तुम्हाला काय सबूत पाहिजे की, सपूत पाहिजे ? , माझ्या देशातील सबूत ही माझ्या देशाचे सर्वात मोठे सपूत आहे. जे लोक सबूत मागत आहे. ते देशातील सपूतला चेतवत आहेत. ए-सॅट मोहिम फत्ते केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, मी जेव्हा काल (२७ मार्च) एस- सॅट मोहिमेविषयी बोलत होतो. तेव्हा काही बुद्धिमान लोक गोंधळून गेले. मी थिएटरच्या सेट विषयी बोलत आहे असे त्यांनी समजले. आता या बुद्धीमान लोकांवर हसावे की रडावे, ज्यांना थिएटरचा सेट आणि अंतराळातील अँटी सॅटेलाईट मिशन यातील फरकच कळत नाही.

मी माझा हिशोब देणार त्याचबरोबर दुसऱ्यांकडूनही हिशोब घेणार, ही दोन्ही कामे बरोबर चालतील. तेव्हाच हिशोब बरोबर होईल. तुम्हाला तरी माहिती आहे की, मी चौकीदार आहे आणि चौकीदार कोणताही अन्याय करत नाही, असेही मोदी यांनी म्हटले.

 

Related posts

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते !

News Desk

…तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा !

News Desk

#LokSabhaElections2019 : ‘मै भी चौकीदार’ व्हिडिओवर काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

News Desk