नवी दिल्ली | “महाआघाडी करणाऱ्या सर्व पक्षांची अशी इच्छा आहे कि देशात एक मजबूर सरकार असावे. परंतु, आमची अशी इच्छा आहे कि देशात एक मजबूत सरकार असावे. जेणेकरून आपल्याला पाकिस्तानला अद्दल घडवता येईल. केवळ नरेंद्र मोदीच हे मजबूत सरकार देऊ शकतात”, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे.
BJP President Amit Shah in Malda: Gathbandhan ke sare neta chahate hain ki desh mein majboor aur dheli dhala sarkar ho aur hum chahate ki desh mein majboot sarkar ho jo Pakistan ke daath khate kar de. Majboot sarkar Narendra Modi hi de sakte hain. pic.twitter.com/hJoUPbLPSJ
— ANI (@ANI) January 22, 2019
मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर देखील सणसणीत टीका केली. बंगालमध्ये दुर्गा पूजा विसर्जनासाठी परवानगी मिळत नाही. मग आता दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही तर काय पाकिस्तानमध्ये करायचे का ? असा सवाल देखील अमित शहा यांनी यावेळी केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.