HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

फक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात !

मुंबई | “भाजपला जर संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत मिळाले तर काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करू”, असा पुनरुच्चार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. “फक्त नरेंद्र मोदी हेच भारताला महाशक्ती बनवू शकतात”, असा दावाही अमित शाह यांनी यावेळी केला आहे. “मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणावर विकास झाला. अमित शाह गुजरातमधील वलसाड येथील प्रचारसभेत बोलत होते.

“आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात देखील आम्ही कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्याचा समावेश केला आहे. जर भाजपला संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत मिळाले तर आम्ही कलम ३७० रद्द करू. हे कलम रद्द केले तर जम्मू-कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनेल”, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. हे कलम रद्द करून आम्ही जम्मू-काश्मीर राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणू, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

Related posts

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तमाम वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न !

News Desk

पवारांचे प्रयत्न निष्फळ, उदयनराजे-निंबाळकरांमधील वाद टोकाला

News Desk

उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा, संप सुरूच !

News Desk