HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

देशाच्या विविधतेला विरोध करत स्वतःला देशभक्त तर इतरांना देशद्रोही ठरविले जाते !

नवी दिल्ली | देशाच्या विविधतेला विरोध करत मोदी सरकार स्वतःला देशभक्त आणि इतरांना देशद्रोही म्हणत आहे, असे म्हणत युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी (६ एप्रिल) पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सिव्हिल सोसायटीने आयोजित केलेल्या ‘जनसरकार’ संमेलनात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारने हा देशाच्या आत्म्यावरच आघात केले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यप्रातीपासून अस्तित्वात असलेल्या सर्व घटनात्मक संस्थांचे अस्तित्व मोदी सरकारने संपवून टाकल्याचा आरोप देखील यावेळी सोनिया गांधी यांनी केला आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या या घटनात्मक संस्थांचे अस्तित्व जर टिकवून ठेवायचे असेल तर मोदी सरकारला पराभूत करण्याशिवाय पर्याय नाही, असेही सोनिया गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

यूपीए सरकारच्या काळात सिव्हिल सोसायटीच्या सहकार्याने अनेक चांगले निर्णय घेणयात आले आहेत. मात्र, आता विशेषकरून काही उद्योजकांचे हित जपले जात आहे. मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणेदेणे नाही, असेही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ची हाफ सेंच्युरी

News Desk

फडणवीस पवारांची राजकीय जुगलबंदी

News Desk

मराठा आरक्षणाचा एटीआर विधानसभेत मांडणार

News Desk