HW News Marathi
राजकारण

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर 

औरंगाबाद | उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी ६ जून रोजी होईपर्यंत या मतदारसंघातील मतमोजणी स्थगित ठेवण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका घेण्यात आल्या. पण, त्यापैकी आज फक्त पाज मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी २-२ जागांवर विजयी मिळाला. फक्त कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळवण्यात यश आले.

बीडमधील अपात्र ११ नगरसेवकांना मतदानाची मुभा देताना त्यांची मते निकालावर परिणामकारक ठरत असतील तर या निवडणुकीचा निकाल जाहीर करू नये. ही निकाल संबंधित याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला होता. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांच्यात दुहेरी लढत झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता भाजपचा स्वबळाचा नारा

News Desk

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

News Desk

RamMandir : नीलम गोऱ्हेंचे पुण्यातून श्रीरामांना साकडे

News Desk