HW News Marathi
राजकारण

…नाहीतर त्यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली काम करावे | रामदास आठवले

मुंबई | “माझा पक्षाच्या नावातच ‘रिपब्लिकन ए’ आहे. आम्ही ‘बी’ वगैरे काही नाही. आम्ही लपून छपून राजकारण करत नाही”, अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना निशाणा साधला आहे. “मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला मी तयार आहे. मात्र, जर ते यासाठी तयार नसतील तर त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली काम करावे”, असा टोलाही यावेळी रामदास आठवले यांनी लगावला आहे.

“समाजाचा कोणताही एकच पक्ष जर एकजूटीने काम करू शकला तर एका खासदारावरून नक्कीच त्या समाजाचे ४ ते ५ खासदार निवडून येतील”, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. एकाच समाजाचे गटनिहाय पक्ष करून लढण्यापेक्षा एकत्र येऊन समाजासाठी लढलो तर ते त्या समाजासाठी फायदेशीर ठरेल”, असेही रामदास आठवले यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला जिवे मारण्याचा कट । तेज प्रताप यादव

News Desk

साहेब मराठी शाळा वाचवा, विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे ‘मातोश्री’बाहेर आंदोलन 

News Desk

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

News Desk