HW News Marathi
राजकारण

पर्रीकरांचे पार्थिव ठेवल्याने कला अकादमीचे केले शुद्धीकरण, राज्यभरातून निषेध व्यक्त 

गोवा | गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्चला वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. दरम्यान, १८ मार्चला सकाळी अंत्यदर्शनासाठी पर्रिकर यांचे पार्थिव भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सामान्य नागरिकांसाठी त्यांचे पार्थिव कला अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, पर्रीकरांचे पार्थिव ठेवण्यात आल्याने कला अकादमीचे चक्क शुद्धीकरण करण्यात आले आहे. यामुळे, वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या या कृतीचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मनोहर पर्रिकर यांच्यावर १८ मार्चला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. प्रशासनाची ही कृती मनोहर पर्रिकर यांचा आणि त्यांच्या स्मृतीचा अपमान आहे. राज्य सरकारचे कला आणि संस्कृती खाते हे धार्मिक विकृतीच्या संपूर्णपणे आहारी गेले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून व्यक्त केली जात आहे.

काही ब्राह्मणांनी गोमूत्र शिंपडून कला अकादमीचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. यावेळी या ब्राह्मणांसोबत कला अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर देखील होते. मात्र, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तेथे उपस्थित कामत नावाच्या कर्मचाऱ्याने ‘आम्ही’ याचे प्रयोजन केल्याचे म्हटले. ‘आम्ही’ म्हणजे कला अकादमी कि बाकी कोणी ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युतीसाठी भाजपकडून मनसेची मनधरणी ?

News Desk

“अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही”, शरद पवारांनी भाजपला टोला लगावला

Aprna

राज्यामधील ५४७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात; आज निकालानंतर 16 जिल्ह्यांना सरपंच मिळणार

Aprna