HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल !

मुंबई | बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत देखील पक्ष लवकरच निर्णय घेईल, असा सूचक इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे. पक्षाविरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. थोड्याच वेळापूर्वी अशोक चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्याचसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल देखील पक्ष लवकरच निर्णय घेईल, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांची पुढची भूमिका काय असणार ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. अहमदनगरमध्ये १२ एप्रिल रोजी झालेल्या सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत होती. परंतु, मोदींच्या या सभेत राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अनुपस्थितीने राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश ही एक अफवाच ठरली.

 

Related posts

आता आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा खटाटोप

News Desk

HW Impact : बुलढाण्यातील ‘विषारी पाण्याच्या गावाची’ प्रशासनाने घेतली दखल

News Desk

हाफिज सईदला ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ !

News Desk