HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नायडूंनी २४ तासांत दुसऱ्यांदा घेतली पवारांची भेट, राजकीय हालचालींना वेग

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाथीचे प्रचार संपल्यानंतरपासूनच देशातील राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या निकालानंतरची रणनीती आखण्यासाठी अत्यंत वेगाने पावले उचलली जात आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी शनिवारीच (१८ मे) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसप अध्यक्षा मायावती आणि सप अध्यक्ष अखिलेश यादव या सर्व नेत्यांची भेट घेतली होती. दरम्यान, नायडू यांनी आज दुसऱ्यांदा (१९ मे) शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान, नायडू यांनी दुसऱ्यांदा घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

“विरोधकांची रणनीती अद्याप ठरलेली नाही. निकालांपूर्वी विरोधकांची कोणतीही बैठक होणार नाही”, अशी प्रतिक्रिया नायडू यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली आहे. दरम्यान, या भेटीच्या माध्यमातून शरद पवार हे पुन्हा राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. याआधी नायडू यांनी शुक्रवारी (१७ मे) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा देखील केली होती.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोठी घोषणा

News Desk

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याविरोधात पुकारले बंड

News Desk

येत्या विधानसभेत सेना-भाजप स्वतंत्र लढतील यात शंकाच नाही !

News Desk