HW News Marathi
राजकारण

पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त | ममता बॅनर्जी

कोलकाता | देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला असताना राजस्थान, आंध्रप्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाने कपात करण्यात आल्याची घोषणा केली.

कोलकातामध्ये पेट्रोल 83.75 रुपये प्रतिलिटर असून डिझेल 75.82 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये प्रतिलिटर एक रुपयाने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळणार आहे. राज्यातील जनतेला दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 रूपया कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

आजपासून पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रतिलिटर एक रुपया कमी मोजावा लागणार आहे. ममता बॅनर्जी यांनी इंधन दर वाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार पेट्रोलियम उत्पादनांवरील उपकर कमी करू शकते. मात्र, केंद्राकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत, अशी टीकाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस पक्षाचे काय होणार, हा प्रश्नच आहे !

News Desk

बंगालमध्ये घडलेला हिंसाचार भाजपप्रेरित । जयंत पाटील

News Desk

मोदींनी ‘आयएनएस विराट’प्रकरणी राजीव गांधींवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे !

News Desk