HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

केदारनाथशी माझे वेगळे नाते !

रुद्रप्रयाग | लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय उत्तराखंडच्या दौऱ्यावर गेले. या दौऱ्यादरम्यान मोदींनी कल (१८ मे) केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक केल्यानंतर गुहेत ध्यानसाधना करण्यासाठी गेले होते. मोदी आज (१९ मे) सकाळी गुहेतून बाहेर येऊन प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केदारनाथशी माझे वेगळे नाते, असे मोदी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“यावेळी मोदी यांनी माझे केदारनाथशी वेगळे नाते आहे. इथल्‍या २०१३ मधील नैसर्गिक आपत्‍तीनंर मी इथल्‍या मंदिर आणि परिसराच्या विकासाच्या दृष्‍टीने एक मास्‍टर प्लान बनवला आहे. त्‍यादृष्‍टीने विकासाचे काम सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मी इथल्‍या विकासकामांचा आढावा घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याचबरोबर त्‍यांनी यावेळी निवडणूक आयोग आणि प्रसारमाध्यमांचेही आभार मानले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्‍यांनी आपण केदारनाथाकडे काहीही मागितले नसल्‍याचे सांगितले.” मोदींनी आज बद्रीनाथाचे येथे जावून दर्शन घेत विशेष पूजा केली आहे.

 

 

Related posts

बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही !

News Desk

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले- सुप्रिया सुळे

Ramdas Pandewad

चोराच्या उलट्या बोंबा

अपर्णा गोतपागर