नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये आलेल्या फनी वादळाची माहिती घेण्यासाठी फोन केला होता. परंतु तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींशी फोनवर संवाद साधण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर मोदींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
PMO Sources: Attention has been drawn to reports in a section of media,that TMC has expressed its displeasure at PM Modi speaking only to WB Governor,about the post-Fani situation in the state. TMC have claimed that the PM had called Odisha¬ WB CM. The claim is incorrect.
— ANI (@ANI) May 5, 2019
तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर पीएमओने ही माहिती दिली. काल (४ मे) सकाळी दोनवेळा ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या स्टाफने ममता बॅनर्जी यांना फोनही केला होता. मात्र, ममता बॅनर्जी एका दौऱ्यावर असल्याचे सांगिण्यात आले. या दौऱ्यावरून परत येताच त्या पंतप्रधानांना फोन करतील, असे सांगण्यात आल्याची माहिती मिळाली होती. याप्रकारे दोनवेळेस पीएमओ कार्यालयाने संपर्क साधूनही मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, असे सांगितले.
Spoke to Shri Keshari Nath Tripathi Ji, the Governor of West Bengal on the situation due to Cyclone Fani. Reiterated the Centre’s readiness to provide all help needed to cope with the cyclone. Also conveyed my solidarity with the people of Bengal in the wake of Cyclone Fani.
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2019
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनी चक्रीवादाळानंतर ओडिशाचे मुख्यंमत्री नवीन पटनायक यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे मोदींकडून शिष्टाचार नियमांचा अपमान केल्याचं तृणमूल काँग्रेसने म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.