HW News Marathi
राजकारण

विरोधकांना देशासोबत उभे राहण्यात संकोच वाटतो !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकांचा सर्वपक्षीय प्रचार आता ऐन रंगात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभा, भाषणांच्या माध्यमातून आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता विधानसभेकरिता महाराष्ट्र भाजपच्या प्रचाराकरिता खुद्द पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांना सुरुवात झाली आहे. या विधानसभेकरिता राज्यात अमित शाह यांच्या एकूण १२ तर पंतप्रधान मोदी ९ सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज (१३ ऑक्टोबर) त्यांची पहिली प्रचारसभा जळगाव येथे घेतली. यावेळी त्यांनी विशेषतः काश्मीरच्या मुद्द्यावरून विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या जळगावमधील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • मी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाला मत द्या.
  • ४ महिन्यांपूर्वी दिलेल्या मताधिक्याबद्दल तुमचे आभार
  • लडाख, जम्मू-काश्मीर ही केवळ जमीन नाही तर हे भारताचे मस्तक आहे.
  • देशातील काही राजकीय पक्ष आणि नेते जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत.
  • तेच राजकीय पक्ष महाराष्ट्रात मत मागण्यासाठी येत असून, त्यांच्या मुलाखती बघा. त्यांची भूमिका शेजारी देशाच्या भाषेसारखी आहे.
  • मी विरोधकांना आव्हान देतो. मैदानात या.
  • तुमच्यात हिंमत असेल तर कलम ३७०, ३५ अ आणि तिहेरी तलाकचा निर्णय बदलण्याची जाहिरनाम्यात घोषणा करा.
  • गेल्या ७० वर्षांपासून जम्मू काश्मीरातील वाल्मिकी बंधूना जगण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलं.
  • आम्ही संपूर्ण सावधगिरीने ५ ऑगस्टला कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
  • काश्मीरमध्ये ४० वर्षांपासून अशांतता होती.
  • मी वचन देतो ४ महिन्यात काश्मीर पूर्वपदावर आणेन. मी त्यासाठी कटिबद्ध आहे.
  • जम्मू काश्मीरविषयी देश जो विचार करतो. त्याच्या उलट विरोधक विचार करतात. त्यांना देशासोबत उभं राहण्यात संकोच वाटतो.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

Aprna

सत्तेचा माज आला असेल तर ती सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे !

News Desk

ठाकरे-आंबेडकरांमध्ये दीड तास बैठक; आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा ?

Aprna