नवी दिल्ली | राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या बैठकीत आज (२५ मे) नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. एनडीएच्या ३५३ खासदारांनी पंतप्रधानपदासाठी एकजुटीने पाठिंबा जाहीर केला आहे. देशातील जनते स्पष्ट बहुमत दिले आहे. या जबाबदारी वाढली असून सत्ताभाव सोडा, सेवाभाव जोडा, अस मोदींनी संसदेच्या सेंट्ल हॉलमध्ये उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले आहे.
PM Narendra Modi: People have accepted us due to our 'seva bhav'. One has to prepare oneself to be always ready to help people even when you move through the lanes of politics and power. pic.twitter.com/abd5ZCYiGQ
— ANI (@ANI) May 25, 2019
यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटू मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. या बैठकीवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे मोदींनी आशीर्वाद घेतले. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची गळाभेट घेतली.लोकसभेत पहिल्यांदा खासदारझालेल्यांनी प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहा. लालकृष्ण अडवाणी नेहमी सांगायचे की, छापणे आणि दिसणे यापासून लांब राहिला तर ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे टीव्हीवर दिसणे आणि पेपरमध्ये छापून येणे दूर ठेवा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव निर्वाचित खासदारांना दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.