HW News Marathi
राजकारण

कवी मनाचे महानेतृत्व हरपले | आठवले

मुंबई | भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राजकारणातील अजताशत्रू , सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे कविमनाचे सर्वसमावेशक महान नेतृत्व हरपले आहे.अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. राजकारणातील सात्विक, सभ्य, कवी हृदयाचे सुसंस्कृत, प्रेरणादायी आदर्श व्यक्तीमत्वाचे अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील पितामह देशभक्तीचा बुलंद आवाज असणारे प्रभावी वक्ते होते. भाजप चे ज्येष्ठ नेते एवढीच त्यांची प्रतिमा नव्हती तर सर्व राजकीय पक्षात त्यांचे चाहते होते. घराघरात त्यांच्या वक्तृत्वाचे चाहते होते. सत्तेत असले तरी साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या अटलजींच्या व्यक्तिमत्वाची नेतृत्वाची कर्तृत्वाची आणि वक्तृत्वाची देशवासीयांना मोहिनी होती.

अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी माझे चांगले संबंध होते.त्यांच्या बद्दल मला आदर होता. ते चांगले कवी सुद्धा होते. ते एनडीए च्या काळात प्रधानमंत्री होते. त्याकाळात आम्ही संसदेत भेटत असु. त्यांना मराठी भाषा चांगली येत होती. अनेकदा त्यांनी मला भेटल्यावर मराठी भाषेतच मला कसे आहात असे क्षेमकुशल विचारीत असत. त्यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर वाटत होता.त्यांना अनुसूचित जाती जमाती बहुजनांच्या प्रश्नांवर सहानुभूती होती. खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमातींना आरक्षण मिळावे या मागणीस ते अनुकूल होते. त्यांच्या पूर्वीच्या सरकार मध्ये 5 ऑफिस मेमोरंडम अनुसूचित जाती जमातीच्या प्रगती विरुद्ध निघाले होते. त्यातील 3 मेमोरंडम अटल बिहारी वाजपेयी आणि निष्कसित केले होते. त्यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कटुताविहिन मैत्रीपूर्ण राजकारणाचा नवा पायंडा त्यांनी पाडला. विविध पक्षांना सोबत घेऊन आघाडी चे राजकारण यशस्वी करणारे अजातशत्रू नेते अटल बिहारी वाजपेयी होते.

प्रखर राष्ट्रप्रेमी मानवतावादी विचारांचे अटलजी सर्वच पक्षांच्या जवळचे आवडते नेते होते. ते विरोधी पक्षात होते. त्यांनी त्याकाळात विरोधी पक्षांतील नेत्यांची ही मुक्तकंठाने प्रशंसा करीत. इंदिरा गांधींना त्यांनी दुर्गा म्हणून गौरविले होते.जनसंघाचे 2 खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वसमावेशक पक्ष घडवून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविले. 13 दिवसांचे प्रधानमंत्री त्यांनंतर 13 महिन्यांचे प्रधानमंत्री आणि त्यांनंतर 5 वर्ष प्रधानमंत्री म्हणून त्यांनी देशाची सेवा केली आहे.ते देशवासीयांचे प्रेरणादायी नेते होते. त्यांच्या निधनाने भारताचे मोठी हानी झाली आहे. अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आह. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे दुःखद वृत्त कळताच रामदास आठवले हे तातडीने नविदिल्ली ला रवाना झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य

Aprna

गडचिरोलीत आज ४ मतदान केंद्रांवर फेरमतदानाला सुरुवात

News Desk

यवतमाळची आणीबाणी लादली आहे काय ?

News Desk